योगी आदित्यनाथ उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ करणार रोड शो

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही मुंबईत रोड शो होणार आहे. मुंबई उत्तरमध्ये महायुतीचे उमेदवार ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ कुर्ला येथे रोड शो करणार आहे.
हा रोड शो १८ मे रोजी होणार आहे. मुंबईमधील उत्तर भारतीयांच्या मतांसाठी योगी आदित्यनाथ मुंबई आल्याचे दिसत आहे. उत्तर मुंबईमध्ये भाजपचे उज्ज्वल निकम यांचा सामना काँग्रेसच्या धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांच्यासोबत होणार आहे. या मतदारसंघात दोन तगड्या उमेदवारांची घोषणा झाल्याने उत्तर-मध्य मुंबईत हायव्होल्टेज लढत होण्याची शक्यता आहे.

Protected Content