रावेर पंचायत समितीत भाजपाचा गड अभेद ठेवण्यासाठी यांना दिली जबाबदारी !

रावेर प्रतिनिधी । रावेर पंचायत समिती वरील भाजपाचा गड अभेद सोबत सुरक्षित ठेवण्यासाठी आता भाजपा कडून व्यू रचनेला सुरुवात झाली आहे. येथे भाजपाच सभापती व उपसभापती करण्यासाठी पक्षाने तालुक्याचे सुभेदार म्हणून  सुरेश धनके,नंदकिशोर महाजन यांची नेमणुक केल्याचे वृत्त आहे.

येथील रावेर पंचायत समिती राजकीयदृष्टया इतकी चर्चित का.? आली आहे.याचे खास विश्लेषण आम्ही तुम्हाला सोप्या आणि सरळ भाषेत समजविण्याचा प्रर्यत्न करतोय येथील रावेर पंचायत समितीला भाजपाचे आठ सदस्य आहे.यातील बरेच सदस्य हे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या आदेशाला मानणारे आहे.भाजपासाठी हीच मोठी डोकेदुखी आहे.येथे पाच वर्षा पूर्वी माजी मंत्री खडसेच्या समोर कोण केव्हा सभापती व उपसभापती होईल हे सर्व पद आपसात ठरवूण वाटा-घाटी करून घेतले होते.सर्व सुरळीत सुरु देखिल होते.परंतु माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपा सोडुन राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने सर्व गोंधळ उडाला आहे.येथील सभापती जितु पाटील यांनी राजीनामा दिल्या नंतर माजी मंत्री गिरीष महाजन यांच्या समोर सर्व भाजपा सदस्य गेल्याचे वृत्त आहे. व तेथे हम-साथ-साथ है दाखविल्या नंतर येथील सभापती/उपसभापतीची निवड करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.पक्षाने देखिल रावेर पंचायत समितीवर भाजपा झेंडा अभेद ठेवण्यासाठी सुरेश धनके नंदकिशोर महाजन यांना सुभेदार म्हणून नेमणुक केल्याचे वृत्त आहे. 

पंचायत समितीला हे आहेत भाजपा सदस्य

येथील रावेर पंचायत समितीला भाजपाचे अधिकृत सदस्य म्हणून १) जितेंद्र पाटील २) जुम्मा तडवी ३) माधुरी नेमाडे ४) अनिता चौधरी ५) कविता कोळी ६) धनश्री सावळे ७) योगिता वानखेडे ८) पि के महाजन हे आठ सदस्य भाजपाचे असून यातील काही सदस्य नाथाभाऊ समर्थक असल्याने हीच भाजपासाठी मोठी डोकेदुखी आहे.येथे निवडणुकीच्या पुर्वी व्हिप जारी होण्याची देखील दाट शक्यता आहे.

असे आहे संभाव्य पर्याय

पर्याय पहिला सदस्य भाजपा सोबत एकनिष्ठ राहिल्यास येथे ठरल्या प्रमाणे सभापती/उपसभापती होतील

पर्याय दूसरा भाजपा शिवसेना सदस्य आपल्या बाजूने करून महाविकास आघाडीला अवस्थता पसरवु शकतात

पर्याय तिसरा यात नाथाभाऊ यांनी लक्ष घातले तर येथे महाविकास आघाडीची लॉटरी लागण्याची दाट शक्यता आहे.तुर्त नाथाभाऊ येथे फक्त लक्ष ठेवून आहे.अजुन काहीही बोलले नाही

पर्याय चौथा महाविकास आघाडीचे चार सदस्य असून नाथाभाऊच्या मदतीने तिन सदस्य आपल्या बाजूने आणून महाविकास आघाडी आपला सभापती करू शकतो.

यातील कोणता पर्याय सत्यात उतरतो हा येणारी वेळच ठरवणार आहे.

 

Protected Content