रियाने मास्टर माइंडची नावे उघड करावीत – कंगना

 

मुंबई प्रतिनिधी । सुशांत आत्महत्या प्रकरणातील मास्टर माइंडची नावे रियाने उघड करावी अशी अपेक्षा अभिनेत्री कंगना राणावत हिने व्यक्त केली आहे. रिया ही बळीचा बकरा असल्याचा दावा देखील तिने केला आहे.

सुशांत सिंग राजपूत हत्ये प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शन संबंधी एनसीबीने आज अभिनेत्री रिया चक्रवर्तीलाअटक केली आहे. त्यानंतर अभिनेत्री कंगनाने तिची पाठराखण करत “मी नेहमी म्हणत आलेय की रिया फक्त बळीचा बकरा आहे, ती कदाचित ड्रगी असू शकते परंतु आता तिने सुशांतच्या प्रकरणात अनेक पडद्यामागील मास्टरमाइन्डची नावे उघड केली पाहिजेत, ज्या सुशांतने आपली कारकीर्द संपविली? त्याचे चित्रपट कोणी घेतले? त्याची प्रतिष्ठा कुणामुळे बिघडली आणि त्याला ड्रग्ज कोट देत होतं? याबाबत तिने आता पर्दाफाश करावा अन्यथा आता उशीर होईल, अशी प्रतिक्रिया दिली.

इंडस्ट्रीतल्या विशेषाधिकारांमुळे आपल्याला काढून टाकण्यात आले, सुशांतच्या न्यायासाठी मागणी करणारी असलेल्या कंगनाने अप्रत्यक्षरित्या रियाची पाठराखण केली आहे. रिया ही बळीचा बकरा असल्याचा दावा देखील तिने केला आहे.

Protected Content