पर्यायी मार्गांचे नियोजन नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । आजपासून शिवाजीनगर पूल वाहतुकीसाठी बंद झाल्याचा फटका हजारो नागरिकांना पडला असून त्यात सर्वात जास्त हाल विद्यार्थ्यांचे झाले आहेत.

आज जळगावच्या एका भागातील वाहतुकीचा अक्षरश: बट्टयाबोळ झाल्याचे दिसून आले. पर्यायी मार्ग देण्याआधीच पूल पाडण्याची घाई केल्यामुळे हजारो नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. उपलब्ध पर्यायी मार्गांवरील वाहतुकीचे नियोजन कोलमडल्यामुळे अनेक जण ट्रॅफीकमध्ये अडकले. यात विद्यार्थ्यांचाही समावेश होता. अनेक विद्यार्थी आज परिक्षेला वेळेवर पोहचू शकले नाही. सर्वात धक्कदायक बाब म्हणजे तहसील कार्यालयाजवळच्या रेल्वे रूळांवरून अनेक विद्यार्थी ये-जा करत असल्याचे दिसून आले. यामुळे अपघात होण्याची शक्यतादेखील बळावली आहे.

पहा- विस्कळीत झालेल्या वाहतुकीबाबत हा व्हिडीओ वृत्तांत.

Add Comment

Protected Content