नवी दिल्ली वृत्तसंस्था । ज्येष्ठ आयपीएस अधिकारी ऋषीकुमार शुक्ला यांची आज सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ऋषीकुमार शुक्ला हे १९८३च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची आज सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून सीबीआय संचालकपदाच्या नियुक्तीबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत शुक्रवारी झालेल्या बैठकीतदेखील निर्णय झाला नव्हता. मात्र शुक्रवारीच न्यायालयाने या नियुक्तीवरून केंद्र सरकारला फटकारले होते. कोर्टाने ही नियुक्ती तातडीने करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार आज ऋषीकुमार शुक्ला यांना सीबीआयचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.