देवगांव देवळी येथे पाणी फाउंडेशनतर्फे चार दिवसीय कार्यशाळा

अमळनेर ( प्रतिनिधी) तालुक्यातील देवगाव देवळी येथील जिल्हा परिषद शाळा व महात्मा ज्योतिराव फुले स्कूल येथे पाणी फाउंडेशनतर्फे 28 ते 31 जानेवारी 2019 दरम्यान संयुक्तिक कार्यशाळा घेण्यात आली.

पाणी फाऊंडेशनच्या या कार्यशाळेचे उद्घाटन सुवर्णा शिंदे, (मास्टर सोशल ट्रेनर), हायस्कुलचे मुख्याध्यापक अनिल महाजन , जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक खेमराज बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व महात्मा फुले स्कूलचे शिक्षक व पाणी फाऊंडेशनचे समन्वयक उपस्थित होते. या कार्यशाळेत खेळाच्या माध्यमातून मानव, निसर्ग व पाणी यांचा सहसंबंध, सापशिडीच्या माध्यमातून दाखवण्यात आला. पाणलोट विकासाची माहिती ,माहितीपट ,गाणी निसर्गाची धमाल शाळा या सारख्या उपक्रमातून पाण्याचे महत्त्व ,पाण्याची बचत याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. थेंबांची शप्पथ घेऊन शेवटच्या सत्राची सांगता करण्यात आली. या चार दिवसीय कार्यशाळेत सुवर्णा शिंदे (मास्टर सोशल ट्रेनर), गौरव ठाकरे (सोशल ट्रेनर), प्रशांत पवार (टेक्निकल ट्रेनर), अमोल कचरे व सुयोग शिंदे (टेक्निकल अँसिस्टंट) या टीमने अनमोल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेचे कर्मचारी व महात्मा फुले हायस्कूलच्या सगळ्या कर्मचार्यांनी परिश्रम घेतले .

Add Comment

Protected Content