मृत सवंगड्याच्या कुटुंबाला मित्र परिवारातर्फे मदतीचा हात !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अलीकडेच दुर्धर व्याधीमुळे निधन झालेल्या मित्राच्या कुटुंबाला त्याच्या सवंगड्यांनी मदतीचा हात पुढे करून एक आदर्श घालून दिला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी गेल्या सत्ताविस वर्षानंतर मागील वर्षी स्नेह मेळाव्या निमित्त एकत्र आले होते.तेंव्हापासून एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊ लागले. यातच अचानक किशोर बाबूराव पाटील यांना असाध्य विकाराने ग्रासल्याने सर्वांनी त्याला मदतीचा हात पुढे केला. या सर्व मित्रांनी त्याच्या उपचारासाठी आर्थिक मदत केली. मात्र किशोर बाबुराव पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान याा मृत मित्राची परिस्थिती अत्यंत गरिबीची त्यातच किशोरला दोन अपत्य एक आठ वर्षाचा मुलगा तर एक सहा वर्षाची मुलगी हे सर्व लक्षात घेता एकात्मता ग्रुप मधील सर्व मैत्रिणी व सर्व मित्रांनी किशोरच्या सहा वर्षाची मुलगी पूर्वा किशोर पाटील या मुलीसाठी तिच्या पुढच्या भविष्यासाठी एकात्मता ग्रुप मधील ८५ सदस्यांनी फुल नाही तर फुलाची पाकळी या नात्याने तिच्या नावे पोस्टाचे सुकन्या खाते  उघडून  ५१ हजार रुपये एकत्रित करून ठेवले आहेत.यामुळे या एकात्मता मित्र परिवारातील सदस्यांनी जणू,एक मैत्रीची फुंकरने किशोर च्या कुटुंबाला आधार मिळाला आहे.

एकात्मता ग्रुप मित्र आणि मैत्रिणीं यांनी एका वर्षापूर्वी देखील कळमसरे येथील दत्त मंदिर या ठिकाणी दत्तप्रभू च्या मूर्तीला ३१ हजार रुपयाची चांदीचे दागिने भेट दिले होते.त्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी हाच एकात्मता ग्रुप आणि या ग्रुप मधल्या सर्व मित्र आणि मैत्रिणी कळमसरे होऊन दहा किलोमीटर अंतरावर कपिलेश्वर या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी कपिलेश्वर या ठिकाणी फराळाचे वाटप केले होते.नवनवीन उपक्रम राबवण्याचा पायंडाच घालून दिलेला दिसतोय. अशा आदर्श एकात्मता ग्रुप कडून प्रत्येकाने आदर्श घ्यावा असे उत्तम उदाहरण या रूपाने पाहायला मिळत आहे.

ग्रुपचे ग्रुप ऍडमिन सुदाम झुलाल कोळी आणि या ५१ हजार रुपयाचे सुकन्या पोस्टद्वारे  खाते उघडून या सहा वर्षाच्या चिमुकलीच्या पुढील शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मित्रांनी किशोर  पाटील यांच्या परिवारास मदत करून आपल्या मृत मित्राला आगळी वेगळी श्रद्धांजली दिल्याने कळमसरे सह तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे.

Protected Content