कळमसरे येथे शॉर्टसर्किटमुळे ज्वारीचे कणसे जळून खाक (व्हिडीओ)

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील कळमसरे येथील शेतकऱ्याच्या शेतातील ज्वारीच्या कणसाच्या ढिगाऱ्याला विद्यूत तारांच्या शॉर्टसर्किटमध्ये जळून खाक झाले आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील शशिकांत बडगुजर या शेतकऱ्याच्या शेतातील ज्वारीच्या कणसाच्या ढिगाऱ्याला विद्युत तारांचा स्पर्श होऊन शॉर्टसर्किट झाल्याने अडीच बिघे शेतातील ज्वारीची कणसाची डोळ्यासमोर राख झाली आहे. यात शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून याबाबत नुकसान भरपाई ची मागणी केली आहे.पीक कापणीवर आल्याने ज्वारीच्या कणसांचा ढिगारा शेतात एका ठिकाणी जमा ठेवण्यात आला होता, शेतातून गेलेल्या विद्युत लाईनचे तारे लोंबकळत आहेत, त्या तारांचा स्पर्श होऊन शॉर्टसर्किट झाल्याने जमा करून ठेवलेल्या ज्वारीच्या कणसांना आग लागल्याने पूर्णता कोरडेठाक झालेल्या कणसांनी पेट घेतला आणि यात शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/818472145575811/

Protected Content