चाळीसगाव येथे आरोग्य सहाय्यक व सेवक यांची आढावा बैठक

chalisagaon

 

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरात तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक व आरोग्य सेवक यांची आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा हिवताप अधिकारी अर्पणा पाटील यांची विशेष उपस्थिती होती.

शहरात एका महिलेचा डेंग्यूने मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा हिवताप अधिकारी अर्पणा पाटील यांनी नुकतीच भेट दिली. पाटणादेवी रोड परिसरात डेंग्यूने मृत्यू झालेल्या महिलेच्या घरी व परिसरात कंटेनर सर्वेक्षण स्वतः पाहणी केली. नगर पालिका मुख्य अधिकारी यांची भेट घेऊन संबंधित भागात धुर फवारणी विषयी चर्चा करण्यात आली. तसेच परिसरात स्वच्छता व दैनंदिन कंटेनर सर्वेक्षण इत्यादी विषयावर आरोग्य सेवकांना सुचना देण्यात आल्या.

त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक व आरोग्य सेवक यांची आढावा बैठक घेण्यात आली.  येणाऱ्या पारेषण काळात डेंग्यू विषयक आजाराचा उद्रेक पहाता कर्मचारी यांनी गृहभेटीद्वारे जनजागरण करण्यात यावे. डेंग्यू आजार कशामुळे होतो. जनजागरणावर भर देण्यात यावा यासाठी संबंधित आरोग्य सेवकांना (पोष्टर, बॅनर,  हस्तपत्रिका, म्हणी व आरोग्य शिक्षण) सुचना देण्यात आल्या. तसेच ग्रामपंचायती मार्फत खड्डे, डबके बुजविण्याचे कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.डी.के.लांडे व डॉ.बी.पी. बाविस्कर ग्रा.रुग्णालय, चा.मार्गदर्शन अर्पणा पाटील जिल्हा हिवताप अधिकारी तालुका पर्यवेक्षक तडवी, आरोग्य सहाय्यक व्ही.पी.राठोड, एल.सी. जाधव यांचे देखील मार्गदर्शन लाभले.

Protected Content