कोरोना संकटात यात्रोत्सव रद्द ; मुक्ताई मंदिर परिसरात शुकशुकाट (व्हिडिओ)

 

मुक्ताईनगर प्रतिनिधी   परंपरेनुसार अतिशय जल्लोषात साजरा होणारा येथील महाशिवरात्रीचा यात्रोत्सव यंदा कोरोनाच्या आपत्तीमुळे रद्द करण्यात आला आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत भाविकांनी दर्शनाला येऊ नये असे आवाहन मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. रवींद्रभैय्या पाटील यांनी आज लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना केले

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दरवर्षी माघ महिन्यातील विजया एकादशीपासून महाशिवरात्रीपर्यंत मुक्ताईनगर व चांगदेव येथे यात्रोत्सव भरत असतो. परंतु यंदा कोरोना महामारीचे सावट असल्यामुळे यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे. यात्रोत्सव रद्द झाल्याने मंदिर परिसरात शुकशुकाट दिसत आहे.  कुठल्याही प्रकारची दुकाने परिसरात लागलेली नाहीत. तरी परंपरेप्रमाणे आज एकादशीनिमित्त मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. रवींद्रभैय्या पाटील, पंजाबराव पाटील व संदीप पाटील यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. तसेच जुने मुक्ताबाई संस्थान कोथळी येथे सुद्धा महापूजा करण्यात आली.  याप्रसंगी हभप रविंद्र महाराज हरणे, उद्धव महाराज जुनारे, विनायक महाराज हरणे, ज्ञानेश्वर हरणे उपस्थित होते.

 

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/2595513740745771

 

Protected Content