सेवानिवृत्त शिक्षकाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरातील जिल्हा बँकेच्या समोरून एका सेवानिवृत्त शिक्षकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुरूवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात सेवानिवृत्त शिक्षक शालीग्राम पंडीत बहिरम (वय-६५) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी ३ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कामाच्या निमित्ताने गणेश कॉलनीतील जिल्हा बँकेसमोर दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीएन ७१९१) ने आले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी बँकेच्या समोर पार्क करून लावली होती. अज्ञात चोरट्यांनी पार्कींगला लावलेली दुचाकी चोरून नेली. शालीग्राम पाटील हे घरी जाण्यासाठी दुचाकीजवळ आले असता त्यांना दुचाकी जागेवर दिसून आली नाही. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर गुरूवार ६ जुलै रोजी दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप पाटील करीत आहे.

Protected Content