अल्पवयीन मुलीचे अपहरण, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील एका गावात चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखत फूस लावून अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी ६ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर तालुक्यातील एका गावात चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्याला आहे. सोमवारी ३ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला., परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. गुरूवार ६ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जनार्दन पाटील करीत आहे.

Protected Content