मोठा अनर्थ टळला… घरगुती गॅस सिलेंडरने घेतला पेट, वृध्द महिला थोडक्यात बचावल्या !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मानराज पार्क जवळील मुक्ताईनगर परिसरात घरगुती गॅसवर स्वयंपाक करत असतांना सिलेंडरने अचानक पेट घेतल्याने वृध्द महिला थोडक्यात बचावल्या आहेत, तर घरातील इतर सामान जळून नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी ७ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे. स्थानिक नागरीकांच्या मदतीने आग आटोक्यात आणून मोठी दुर्घटना टळली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नवल रामसिंग पाटील रा. गोरगावले ता. चोपडा हे जळगाव शहरातील मानराज पार्क जवळील मुक्ताईनगर परिसरातील सुचिता सुरेश साळुंखे यांच्या घरात गेल्या पाच वर्षांपासून भाड्याच्या घरात आपल्या वृध्द आई अहिल्याबाई पाटील आणि मुलगा मयंक पाटील यांच्यासोबत वास्तव्याला आहे. नेहमीप्रमाणे अहिल्याबाई ह्या शुक्रवारी ७ जुलै रोजी सकाळी १० वाजता घरघुती गॅसवर स्वयंपाक करत असतांना अचानक गॅस सिलेंडरने पेट घेतला. त्यावेळी त्यांच्या घरात त्यांचा मुलगा नवल आणि नातू मयंक यांच्या लक्षात आल्याने त्यांना तातडीने घराबाहेर काढले. तेवढ्यात सिलेंडरचा गॅस लिक झाल्याने मोठा पेट घेतला होता. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शक्ती महाजन व स्थानिक नागरीकांच्या सहकार्याने वाळू व पाणी टाकून आग विझविण्यात आली. त्यानंतर थोड्यावेळाने महापालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. पथकाने पेट घेतलेला सिलेंडर घराच्या बाहेर मोकळ्याजागेत आणला व मोठा अनर्थ टळाला. यात वृध्द महिला किरकोळ भाजल्या गेल्या. या घटनेबाबत अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content