फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परिक्षांचा निकाल ऑनलाईन जाहिर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नगरपालिका उच्च शाळा व ज्युनियर महाविद्यालयाचा ९७ टक्के निकाल लागला आहे.
नगरपालिका उच्च शाळा व ज्युनियर महाविद्यालयातील १२२ विद्यार्थी परिक्षेसाठी बसले होते. यापैकी ११८ विद्यार्थी पास झाले आहेत. विज्ञान शाखा ९८.७६ टक्के; वाणिज्य शाखा ९२.८५ टक्के; कला शाखा ९२.५९ टक्के असा एकूण ९६.७२ टक्के निकाल महाविद्यालयाचा लागला आहे.
विज्ञान शाखेतील पहिले तीन विद्यार्थी
प्रथम :- निलिमा दिनेश पुन्नासे ८६.८३ टक्के
व्दितीय :- इशान राजेंद्र भारंबे ८६.६७ टक्के
तृतिय :- गुणेश्री देवेंद्र झोपे ८६.५० टक्के
वाणिज्य शाखेतील पहिले तीन विद्यार्थी
प्रथम :- शिवाजी अविनाश शिवरामे ७१.०० टक्के
व्दितीय :- राजश्री प्रमोद तायडे ६८.५० टक्के
तृतिय :- साक्षी राजेंद्र कपले ६८.१७ टक्के
कला शाखेतील पहिले तीन विद्यार्थी
प्रथम :- दिपक सुभाष भोई ६७.३३ टक्के
व्दितीय :- भरत सुधिर तेली ६६.५० टक्के
तृतिय :- योगेश वासूदेव भोई ६४.०० टक्के
वरील सर्व गुणवत्ता प्राप्त उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करून इतर सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांचे सुद्धा अभिनंदन नगरपालिकेचे प्रशासन तथा उपविभागीय अधिकारी महसूल कैलास कडलग, मुख्याधिकारी वैभव लोंढे, तत्कालीन नगराध्यक्ष महानंद घुले, उपनगराध्यक्ष नयना चौधरी तसेच शिक्षण सभापती शेख कुर्बान शेख करीम, शालेय समिती अध्यक्ष हेमराज चौधरी, आणि तत्कालीन सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.