Home धर्म-समाज भुसावळ येथे लेवा पाटीदार समाजातील गुणवंतांचा मंगळवारी गौरव समारंभ

भुसावळ येथे लेवा पाटीदार समाजातील गुणवंतांचा मंगळवारी गौरव समारंभ

0
114


f1f0fd3a09e4318e6e0ee608796ff2fa

भुसावळ, प्रतिनिधी | अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे लेवा पाटीदार समाजातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड व भुसावळ तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा २४ वा गुणगौरव समारंभ दि.१० सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता डॉ.बी.व्ही.खाचणे हॉल, टिम्बर येथे आयोजित करण्‍यात आला आहे.

 

 

या कार्यक्रमात समाजातील इयत्ता १० वी, १२ वी, शिष्यवृत्ती तसेच विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते करण्यात येणार आहे. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुटुंबप्रमुख रमेश पाटील तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन माजी मंत्री समाजाचे जेष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे, खा.रक्षा खडसे, ना.हरीभाऊ जावळे, आ.संजय सावकारे, आ.राजुमामा भोळे, नगराध्यक्ष रमण भोळे, माजी आमदार निळकंठ फालक, माजी आमदार शिरीष चौधरी, नाहाटा महाविद्यालयाचे चेअरमन महेश फालक, मसाका चेअरमन शरद महाजन, झुंजार लेवाचे अध्यक्ष अरुण पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. यावेळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अ.भा. लेवा संघाचे अध्यक्ष ॲड.प्रकाश पाटील, उपाध्यक्ष राजेश सुधाकर चौधरी, शहराध्यक्ष देवा वाणी, शाम भारंबे, रूपेश चौधरी आदींनी केले आहे.


Protected Content

Play sound