प्रज्ञावंत कोमलिका शिरूड विद्यार्थीनीचा हृद्य सत्कार

 

जळगाव, प्रतिनिधी । तरसोद येथील आदर्श पोलीस पाटील गोकुळ शिरूड यांची सुकन्या प्रज्ञावंत कोमलीका शिरुड ही विद्यार्थिनी जे.ई.ई पूर्व परीक्षेत २०६५ श्रेणीत येऊन उज्वल यश संपादन केल्याबद्दल निसर्ग व सामाजिक प्रदूषण निर्मूलन समितीचे जिल्हा सहसचिव विजय लुल्हे यांच्या हस्ते शाल तसेच भारतरत्न प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र पुस्तक देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

कोमलिका शिरुडे हिचा कोचिंग क्लासेस असोसिएशन सीसीए महाराष्ट्र राज्य उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रा. पंकज नाले यांनीही पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सत्काराप्रसंगी लुल्हे म्हणाले की, “प्रतिकूल परिस्थितीत व्रतस्थपणे ध्येयप्राप्ती करणारे कोमलिका सारख्या प्रज्ञावंत विद्यार्थीनी दिपस्तंभासमान चिरकाल मार्गदशक असतात.” कोमालिकाचे वडील तरसोद येथे पोलीस पाटील असून त्यांची परिस्थिती बेताची आहे. क्लासची फी भरण्यासाठी एकदा कोमलीकाले दागिने मोडावे लागले हा हळवा प्रसंग सांगतांना कोमलीकाच्या आईचा अश्रूचा बांध फुटला. कोमलीकेने जळगावला इयत्ता बारावीचे शिक्षण मुळजी जेठा महाविद्यालयातील स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेजात घेऊन स्टेट बोर्ड परीक्षेत ८२.३१ % गुण तर इयत्ता १० वी चे शिक्षण सेंट जोसेफ कॉन्व्हेंट सिनियर सेकंडरी स्कूलला सीबीएसइ पॅटर्नमध्ये ९५.२० % गुण प्राप्त केले होते. दहावीत नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेत व आठवीत महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेतही यश खेचून आणले होते. जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पी. के. नाले यांनी कोविड महामारी काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रतिष्ठान तर्फे तरसोदचे आदर्श पोलिस पाटील गोकूळ शिरूड यांचा कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन विशेष सत्कार केला. याप्रसंगी त्यांच्या जीवनसाथी अलका शिरुड व चिरंजीव भाग्येश शिरुड, विजय लुल्हे उपस्थित होते.

Protected Content