सिंधी कॉलनीत हातातून मोबाईल हिसकावून पळ काढणारे दोघांना अटक

जळगाव प्रतिनिधी । सिंधी कॉलनी ते गणेश कॉलनी परिसर अशा सुमारे तीन किलोमिटरची रपेटमध्ये दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी तीन जणांच्या हातातून मोबाइल हिसकाऊन पळ काढला. रविवारी रात्री ७.३० वाजता या घटना घडल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर सोमवारी रात्री पोलिसांनी दोन चोरट्यांना पकडले. हे दोन्ही चोरटे उच्चशिक्षीत आहेत.

आकाश संजय पाटील (वय १८, रा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे) व गणेश राजेंद्र शिंदे (वय १८, रा. वाघनगर) असे चोरट्यांची नावे आहेत. पहिल्या घटनेत सिंधी कॉलनीतील बाबानगरातील रहिवाशी गायत्री आडवाणी ह्या आकाशवाणीजवळच्या संवेदना हॉस्पिटलजवळून जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन जणांनी त्याच्या हातातील मोबाईल धुमस्टाईल लांबविला. दुसर्‍या घटनेत गणेश कॉलोनीतील साईबाबा मंदिराजवळच्या फिरोज शहा यांच्या ए टू झेड मोबाईल शॉप या दुकानात मोबाईल कव्हर घेण्याच्या बहाण्याने आलेल्या या २ अज्ञात तरुणांनी हितेश प्रशांत बर्‍हाटे ( वय १८ रा. मुक्ताईनगर , बजरंग बोगद्याजवळ जळगाव) या ग्राहकाचा मोबाइल हिसकावून धूम ठोकली. तसेच तिसर्‍या घटनेत रिंगरोड भागात एका अल्पवयीन मुलाच्या हातातूनही दुचाकीवरुन आलेल्या २ अज्ञात तरुणांनी मोबाईल हिसकावून पळ काढला आहे. तिन्ही घटनांमधील दोघेही संशयित हे वेगवेगळे नसून एकच असेल्याचे सीसीटीव्हीच्या आधारे निष्पन्न झाले. दोघांना सोमवारी रात्री जिल्हापेठ पोलीसांनी अटक केली. आज मंगळवारी २३ नोव्हेंबर रोजी दुपारी दोघांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

यांनी केली कारवाई

पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय महेंद्र वाघमारे, पीएसआय प्रदीप चांदेलकर, पोहेकॉ महेंद्र पाटील, फिरोज तडवी, पोना संतोष सोनवणे, पोना सलीम तडवी, पोना गणेश पाटील, पोकॉ योगेश साबळे, पोकॉ समाधान पाटील, पोकॉ अमित मराठे, पोकॉ विकास पहुरकर यांनी केली.

Protected Content