हिंदू महासभेच्या युवा जिल्हाध्यक्षपदी पियुष तिवारी यांची निवड

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा हिन्दू महासभेच्या आज झालेल्या बैठकीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात युवक जिल्हाध्यक्षपदी पियुष तिवारी यांची निवड करण्यात आली आहे. 

शहरातील गोलाणी मार्केट येथे आज रविवारी ११ जुलै रोजी सकाळी जळगाव जिल्हा हिन्दु महासभेची बैठक घेण्यात आली. यावेळी नविन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून नवनियुक्त सदस्यांची मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी हिंदू महासभेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी विकास पाटील, कोषाध्यक्ष भगीरथ सैनी, वैद्यकीय आघाडीच्या जिल्हा प्रमुखपदी डॉ. श्यामकांत कदम, तालुका प्रमुख मिलींद नारखेडे , शहरप्रमख कमळकिशोर नागला, जिल्हा महानगराध्यक्ष भरत कोचुरे, महानगरप्रमुख दिपक तायडे, तर महिला आघाडी जिल्हाध्यक्षापदी सरला नारखेडे, संघटकपदी मिनाताई इंगळे यांची निवड करण्यात आली. यावेळी निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी राष्ट्रीया उपाध्यक्ष ॲड. गोविंद तिवारी, नारायण अग्रवाला, उमाकांत वाणी, संजय निकुंभ यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. याबैठकीला दशरथ सोनवणे, आबासाहेब पाटील, ॲड. नेमचंद येवले, ॲड. भूषण सुर्यवंशी, ॲड. संजय खडके, प्रकाश तिवारी, बाळू विदुर, ॲड. राजेंद्र चोपडे, ॲड. अभिजित बासुगडे, ॲड. योगेश वाणी, संजय ओतारी, विनोद गवांदे आदी उपस्थित होती.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!