Home Uncategorized ब्रेकींग : जळगाव महापालिकेत भाजपला पुन्हा खिंडार ?

ब्रेकींग : जळगाव महापालिकेत भाजपला पुन्हा खिंडार ?

0
117


जळगाव प्रतिनिधी । जळगाव महापालिकेत भाजपमध्ये उभी फूट पाडून सत्ता काबीज करणार्‍या शिवसेनेने आज पुन्हा एकदा भाजपला हादरा दिला असून आज तीन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेशाची तयारी केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, तीन दिवसांपूर्वीच मुक्ताईनगरच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर आज महापालिकेतील तीन नगरसेवकांनी वर्षा बंगल्यावर आज शिवसेनेत प्रवेशाची तयारी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून ते लवकरच याबाबत विवरण जाहीर करणार आहेत.

अलीकडेच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. तर चार नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात आले होते. यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. यानंतर आज दुपारी काही नगरसेवक हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली होती. तर सायंकाळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी तीन नगरसेवक शिवसेनेत प्रवेश घेत असल्याची माहिती दिली. लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रतिनिधीने त्यांना विचारणा केली असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. काही वेळात ते पूर्ण माहिती देणार आहेत.

(सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा)


Protected Content

Play sound