विवेकानंद प्रतिष्ठान महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम बारावीचा १००% निकाल

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | बारावीच्या परीक्षेत विवेकानंद प्रतिष्ठान महाविद्यालयाने १०० टक्के निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे. महाविद्यालयातून स्नेहा भागवत चिमकर हिने (९०.६७) टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक पटकाविला आहे.

 

विवेकानंद प्रतिष्ठान महाविद्यालयात स्नेहा भागवत चिमकर हिने (९०.६७) टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक पटकाविला असून घन:शाम सोमनाथ गोहिल (८९.६७) याने दुसरा क्रमांक, सुजल दिपक भंगाळे (८८.१७), गौरव सुभाषचंद्र जाधव (८८.१७) अनुक्रमे तिसरा क्रमांक पटकाविला आहे. तसेच अदिती योगेश दिक्षित (८६.६७) हिने चौथा क्रमांक तर चेतन प्रवीण बोरसे (८५.६७) याने पाचवा क्रमांक प्राप्त केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभाताई पाटील, सचिव राजेंद्र नन्नवरे, हेमाताई अमळकर, प्रा.डॉ. विवेक काटदरे, शालेय समिती प्रमुख विनोद पाटील, प्रशासकीय अधिकारी दिनेश ठाकरे तसेच वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पाठक, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य उमेश इंगळे व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Protected Content