रावेर प्रतिनिधी । रावेर कृषी उपन्न बाजार समितीचे सभापती श्रीकांत महाजन व उपसभापती उस्मान तडवी यांनी आपला पदाचे राजीनामे दिले आहे.यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
विद्यमान सभापती श्रीकांत महाजन यांचा पदाचा कार्यकाळ मागील वर्षीच संपले होते. परंतु विद्यमान आमदार शिरीष चौधरी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष निळकंठ चौधरी यांनी मुंबईत जाऊन मुदतवाढसाठी प्रयत्न केले होते. यावेळी ६ महीने मुदतवाढ देखील मिळाली होती. ६ महीने मुदत संपली असून रावेर बाजार समितीला पुन्हा ६ महीने मुदतवाढ मिळाली आहे. परंतु यावेळी सभापती श्रीकांत महाजन व उपसभापती उस्मान तडवी यांनी आपला पदाचे राजीनामे दिले आहे. येत्या दि २० रोजी सभापती व उपसभापती पदाची निवडणूक होत आहे.यावेळी गोपाळ नेमाडे यांची सभापती होण्याची दाट शक्यता आहे.तर गोंडु महाजन यांची उपसभापती पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.