स्व. पत्रकार कैलाससिंग परदेशी व लीना अरोरा यांच्या स्मरणार्थ स्तुत्य उपक्रम

सावदा ता.रावेर (प्रतिनिधी) । सावदा येथे कोरोना महामारीत मयत झालेले दै.सामनाचे पत्रकार स्व. कैलाससिंग गणपतसिंग परदेशी व स्व, लीना राजकुमार आरोरा यांचे स्मरणार्थ ओरिजिनल पत्रकार संघ सावदा आणि सलग्न मराठी पत्रकार संघ. मुंबई.यांच्यातर्फे शहरातील कोरोना काळात गरजू कोविड रुग्णांसाठी अत्यावश्यक सेवा म्हणून ऑक्सीजन सेवा सुरू करण्यात आली.

 

या सवेचे आज औपचारिक उद्घाटन करण्यात आले. ऑक्सिजन सिलेंडर सावदा नगरपरिषदेच्या स्वाधीन करून रुग्णांसाठी पालिकेतर्फे सुरु करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेत लावण्यात आले असून गरजू रुग्ण ऑक्सिजनची सेवा घेत आहेत. ऑक्सिजन सेवा ही ओरिजनल पत्रकार संघ सलग्न महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई याचे कडून गेल्या पंधरा दिवसापासून सुरू करण्यात आलेली आहे.

 

पत्रकार संघाकडून  गरज पडल्यास नेहमीसाठी रुग्णवाहिकेत ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध केले जाणार असून आहे. गरजूंनी ओरिजिनल पत्रकार संघ सावदा यांच्याशी संपर्क साधण्याचे देखील यावेळी आवाहन केले गेले. या छोटेखानी ऑक्सीजन सिलेंडर उदघाटन कार्यक्रमात सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी, ओरिजनल पत्रकार संघाचे अध्यक्ष युसूफ शाहा, उपाध्यक्ष व जिल्हा संघटक कैलास  लवंगडे, सचिव दीपक श्रावगे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष  व सल्लागार भानुदास भारंबे, प्रसिद्धीप्रमुख प्रदीप  कुलकर्णी, सकलकडे सर, सदस्य फरीद शेख, संतोष परदेशी, सावदा तलाठी  शरद पाटील, हॉटेल पंजाब चे मालक राजूभाई पंजाबी, व स्व,  पत्रकार कैलाससिंग यांचे सुपुत्र उद्धवसिंग कैलाससिंग परदेशी,ॲम्बुलन्स चालक विकी भिड़े, गोटू पाटील आदी उपस्थित होते.

 

सदर कार्यक्रम वेळी कोरोना काळात संवेदनशीलपणे आपले कर्तव्य बजावणारे सावदा नगर परिषदेचे मुख्यधिकारी सौरभ जोशी यांना ओरिजिनल पत्रकार संघ सावदाच्या वतीने ” कोरोना योद्धा ” म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.

Protected Content