भाजपतर्फे प्रसिद्धी व सोशल मिडिया बैठक (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 10 05 at 7.53.11 PM

जळगाव, प्रतिनिधी | प्रसिद्धी प्रमुख व सोशल मिडिया हा पक्षाचा मुख्य प्रचारक महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे भाजपा महानगराची प्रसिद्धी व सोशल मिडिया बैठक आयोजित करण्यात आली होती.

महायुतीचे अधिकृत उमेदवार व जळगाव शहराचे आ. सुरेश दामू भोळे यांच्या प्रचाराला लवकर सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने आज शनिवार दि. ५ ऑक्टोंबर रोजी दुपारी १ वाजता जि.एम फाउंडेशन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष व महायुतीचे उमेदवार आ.सुरेश भोळे व उमेदवार निवडणूक प्रमुख आ.चंदूभाई पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जेष्ठ माजी प्रसिद्धी प्रमुख व जिल्हा संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जिल्हा महानगरातील ९ मंडलातील मंडल, युवा, महिला प्रसिद्धी प्रमुख व सोशल मिडिया प्रमुखांची बैठक घेण्यात आली.या बैठकीला प्रमुख मार्गदर्शन करतांना विशाल त्रिपाठी यांनी सांगितले की, प्रसिद्धी व सोशल मिडिया हे पक्षाच्या प्रसिद्धीचे मुख्य आधार स्तंभ आहेत. आपल्याला प्रचार व प्रसार करतांना निवडणूक आयोगाचे पालन करावयाचे आहे, लवकरच मुख्य प्रचाराला एक दोन दिवसात सुरुवात होईल. या वेळेस आपल्या मंडलात आपल्या प्रभागात होणाऱ्या प्रचार सभा, कॉर्नर बैठका याचे व्यवस्थितरित्या कवरेज करून सोशल मिडियावर पाठवायचे आहे. या बैठकीप्रसंगी महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे यांनी सांगितले की, प्रसिद्धी मध्यम हे अतिशय मोलाचे मध्यम असून या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या बातम्या किंवा एखादी पोस्टला खूप मोठी प्रसिद्धी मिळू शकते. आपल्याला प्रचार प्रसिद्धी करतांना आगामी काही दिवसात केंद्र व राज्य सरकारने केलेल्या विकास कामांची तसेच जळगाव शहरासाठी ना. गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून विकास कामांसाठी मिळालेला कोट्यावधी रुपयाचा निधी असून आपल्या मंडलातील किंवा आपल्या प्रभागात अनेक विकास कामे झाले आहेत. काही कामे प्रगती पथावर आहेत, या केलेल्या विकास कामांची माहिती आपण सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रसारित करून आपल्याला कुणावरही चिखल फेक न करता फक्त विकास कामांवर चर्चा करायची आहे असे या बैठकी प्रसंगी सांगितले. प्रस्ताविक जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर यांनी केले. बैठकीला प्रमुख उपस्थिती निवडणूक समन्वयक दीपक साखरे, सरचिटणीस महेश जोशी, सोशल मिडिया प्रमुख महेश ठाकूर, महिला आघाडी अध्यक्षा, सहप्रसिद्धी प्रमुख संजय शिंदे, युवा मोर्चाचे हर्षल नेवे उपस्थित होते.निवड झालेले प्रसिद्धी प्रमुख व सोशल मिडिया प्रमुख नऊ मंडलातील मंडल, युवा मोर्चा व महिला आघाडी खालील प्रमाणे प्रसिद्धी प्रमुख : विनय निंबाळकर, कल्पेश ढीवरे, स्वप्नील खडसे, प्रतिक सेठ, अनिल (बंटी)बारी, निलेश चौधरी, दिलीप सोनवणे, गणेश निकम, रुपेश मोरे सोशल मिडिया प्रमुख : दिनेश पुरोहित, भगवान जैतकर, शुभम पाटील, अंकुश पाटील, मयूर मुकदुम, सुहास जोशी, आकाश पारधे, तेजस जोशी युवा मोर्चा : अक्षय सोनवणे, सोनू तायडे, निलेश चव्हाण, ओम राणा, पंकज हनुमंते, तुषार पवार, अक्षय जेजुरकर, अजिंक्य खैरनार, योगेश गोसावी, अक्षय पाटील, योगेश चौधरी, रुपेश मौर्य. सोशल मिडिया महिला आघाडी : रेखा खैरनार, ज्योती कुलकर्णी, शोभा कुलकर्णी, रेखा वर्मा, नीतू परदेशी, छाया सारस्वत, विद्या सोनवणे, लीला चौधरी, जयश्री पाटील, तृप्ती पाटील, निर्मल सपकाळे, आशा सपकाळे, माया कोळी, मंगला निकम  तसेच प्रसिद्धी व सोशल मिडिया सह प्रमुख – विजय चौधरी, बाबुराव बाविस्कर, नीर जैन, कमलाकर अहिरे, प्रतिक चौधरी, अजय सोनवणे, निलेश चव्हाण बैठकीचे आभार युवा मोर्चाचे प्रसिद्धी प्रमुख हर्षल नेवे यांनी केले.

 

Protected Content