ब्रेकींग : गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

मुंबई प्रतिनिधी । परमबीरसिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले असून मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आहे.

१०० कोटींच्या खंडणी प्रकरणानंतरच अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत होती. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. यामुळे त्यांना अभय मिळणार असल्याचे दिसून आले होते. मात्र आज उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा सीबीआयने तपास करावा असे निर्देश दिल्यानंतर अनिल देशमुख यांची विकेट पडली आहे.दरम्यान, उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर अनिल देशमुख यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. यानंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला.

Protected Content