नक्षलवाद्यांविरोधात आता ‘ऑपरेशन प्रहार-3’

 

 

 

बिजापूर: वृत्तसंस्था | छत्तीसगडच्या बिजापूर येथे नक्षलवाद्यांशी चकमकीत 22 जवान शहीद झाले. नक्षलवाद्यांविरोधात आता जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा दल प्रहार-3 ही मोहीम हाती घेणार असून टॉप 8 कमांडर रडावर आहेत.

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांविरोधातील मोहीम अधिक गतीमान करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी ह्युमन इंटेलिजन्स आणि टेक्निकल इंटेलिजन्सची मदत घेण्याचे आदेशही दिले आहेत. एनटीआरओ सुरक्षा एजन्सीची रिअल टाईम माहिती देऊन मदतही केली जाणार आहे.

 

सुरक्षा यंत्रणा आता मोस्ट वाँटेड नक्षली कमांडरची यादी करून लवकरच त्यांच्या विरोधात मोहीम हाती घेणार आहे. ऑपरेशन प्रहार-3 नुसार नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यात येणार आहे. सुरक्षा दलाने काही टॉप नक्षलवाद्यांची यादीही बनवली आहे. इतर नक्षलवाद्यांची यादी तयार करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. या यादीत पीएलजीए-1 चा सर्वात मोठा कमांडर हिडमाचाही समावेश आहे. हिडमा हा सुकमाच्या जंगलात लपून सुरक्षा दलाच्या जवानांना टार्गेट करत असल्याचं सांगितलं जात आहे.

 

हिडमा , कमलेश ऊर्फ लछू , साकेत , मंगेसजी , रामजी , सुखलाल , मलेश  हे सर्वजण नक्षल्यांच्या विविध गटांचे कमांडर आहेत. हेच लोक सुरक्षा दलावर हल्ला करण्याची योजना आखत असतात. तरुणांना नक्षलवादी चळवळीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्नही करत असतात. त्यामुळे या आठही टॉप कमांडरची सुरक्षा दलाने यादी तयार केली असून त्यांच्याविरोधात लवकरच मोठी मोहीम हाती घेतली जाणार आहे

Protected Content