इंदूरऐवजी महेश्वरला अहिल्यादेवींची राजधानी म्हणून पसंती

 

रावेर : शालिक महाजन । आक्रमकांपासून राज्य वाचवण्यासाठी अहिल्यादेवी होळकरांनी तत्कालीन परिस्थितीत राजधानी इंदूरहून महेश्वरला हलविण्याचा निर्णय घेतला होता . ही राजधानी पुनर्स्थापित करता त्यांनी स्थापत्यकलेचा नवा अविष्कारही जगाला दाखवून दिला .

मध्य प्रदेशच्या दक्षिणपूर्व भागात पसरलेले महेश्वर हे रावेरपासून सुमारे १४० किमी अंतरावर आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी नर्मदा नदीच्या किनारी बसविलेले अदभुत आणि भव्य महेश्वर येथेच किल्ला तयार करून घेतला. इंदौरची राजधानी महेश्वर येथे आणण्यामागे त्यांचा एक खास हेतु होता आक्रमकापासुन वाचविण्यासाठी अहिल्यादेवी यांनी महेश्वर बसविले होते.

mahrshwar 2

इ स १७५४ मध्ये खांडेराव होळकर हे कुंबेरच्या युध्दा धारातीर्थी पडले. त्या नंतर आहिल्यादेवी होळकर यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी राज्याचा कारभार पाहिला परंतु त्यांचेदेखील १२ वर्षानी निधन झाल्यामुळे राज्याची सर्व सूत्र महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या हातात आली त्यांनी मोठा निर्णय घेत इंदौर येथे असलेली राजधानी व सर्व कारभार महेश्वर येथे घेऊन आल्या.

महेश्वर येथे नर्मदा नदीच्या किनारी भव्य व मजूबत किल्ला तयार केला नर्मदा नदीच्या किनारी बसलेले महेश्वर मंदिरासाठीसुध्दा प्रसिध्द आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या प्राचीन किल्ल्याचे बांधकाम मोगल बादशाह अकबर यांनी १६०१ मध्ये केले होते महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी हा भाग जिंकून येथेच घर तयार केले

mahrshwar 3

हा किल्ला मराठा शिलाकृतीत तयार केला आहे. महाराणी अहिल्यादेवी सशक्त शासक होत्या त्यानी १७६७ पासून ते १७९५ पर्यंत मराठा होळकर शासनाचा कारभार सांभाळत नेतृत्व केले अनेक वेळा युध्द मैदानावर अहिल्यादेवी होळकर स्वत: उतरायच्या आणि आपल्या सेनेचे नेतृत्व करत

राजधानी इंदौरवरुन महेश्वर आणण्यामागे हल्लेखोरांपासून वाचवण्याचा खास हेतु होता. यापेक्षाही जास्त अहिल्याबाई यांना धार्मिक बाबतीत जास्त ओळख होती त्या शिवाच्या मोठ्या भक्त होत्या. त्यांनी भारतात मोठ्या संखेने मंदिरे, धर्मशाळा आणि घाट तयार केले

अहिल्याबाई यांना कलेचीसुध्दा आवड होती. सांगितले जाते की सूरतच्या बुनकरांना महेश्वर मध्ये त्या काळात त्यांनी आणले आणि त्यांना येथेच काम करण्याचा आग्रह करून साळीवर खास डीझाईन तयार करायला लावली आजसुध्दा येथील खास रेशमपासून तयार केलेली महेश्वरी साडी संपूर्ण भारतात प्रसिध्द आहे.

mahrshwar 4

त्या काळात शेतकरी यांच्यावरचा कर कमी करण्यासाठीसुध्दा राणी अहिल्यादेवी होळकर उदार राहिल्या याच कारणामुळे त्यांच्या शासन काळात मराठा-मालव राज्याने प्रगती केली

होळकर परिवाराने राज्याचे उत्पन्न कधीच परिवारासाठी वापरले नाही परिवारासाठी त्यांनी खाजगी संपत्तीतुन खर्च भागविला लोक सांगतात की त्या काळात महाराणी अहिल्यादेवी बाई होळकर यांच्या जवळ त्यांची १६ कोटी रुपयांची संपत्ती होती यातूनच त्यांनी देश भरात मंदिर , घाट व धर्मशाळा तयार केल्या

mahrshwar 5

महेश्वरमध्ये आज पुरातन शिव मंदीर आहे. येथे धार्मिक आणि पर्यटन म्हणून मध्य प्रदेश व महाराष्ट्र मधुन अनेक लोक येत असतात.यासाठीच महेश्वर आहिल्यादेवी होळकरांच्या नावाने प्रसिध्द आहे.

Protected Content