धानोऱ्यात पाणी टंचाई ; महिला धडकल्या ग्रामपंचायत कार्यालयावर (व्हीडीओ)

dhanora 1

 

धानोरा ता.चोपडा (वार्ताहर) तालुक्याती अगदी शेवटचे गाव म्हणुन ओळखले जाणारे गाव म्हणजे धानोरा होय. गावातील चर्मकार वाड्यात नळाला पाणीच येत नसल्याच्या निषेधार्थ महिला ग्रामपंचायतीवर धडकल्याचा प्रकार आज सकाळी घडला.

 

चर्मकारवाड्यात पाणी येत नाही, म्हणुन धानोरा ग्राम पंचायतीने चर्मकार वाड्यासाठी नविन पाण्याची पाईप लाईन टाकली होती. त्यानंतर चर्मकार वाड्याचा नळांना सुरळीत पाणी पुरवठा होत होता. परंतु अवैध नळ कनेक्शनमुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवायला सुरुवात झालीय. अगदी या पाईप लाईनीवर आता चर्मकार वाड्याला पिण्याचे पाणीच मिळत नाहीय. म्हणुन आज सकाळी 10 वाजेला धानोरा ग्रामपंचायतीमध्ये हे सर्व विषय मांडले. यावेळी महिलांनी एक तक्रारी अर्ज लिहून दिला आहे. ग्रामपंचायतमधील कर्मचारी यांच्याकडे देण्यात आला. यावर संबंधित महीलांना सांगण्यात आले की, लवकरच पाण्याचा प्रश्न सोडवण्यात येईल, असे आश्वासन सरपंच पती किरण पाटील यांनी दिले. यावेळी शैवंताबाई सोनवणे,ललिता वानखेडे,शोभाबाई सोनवणे,लताबाई सोनवणे,तेजस्विनी सोनवणे,मायाबाई सोनवणे,उषाबाई सोनवणे,मंदाबाई सोनवणे,चिधाबाई सोनवणे,विजय सोनवणे,विलास सोनवणे,अविनाश वानखेडे,चेतन सोनवणे,जितेद्र भोई, आदी उपस्थित होते.

 

Add Comment

Protected Content