वंचितांना मिष्टान्न भोजन देऊन साजरा केला विवाहाचा वाढदिवस

पाचोरा प्रतिनिधी । येथील शिक्षक दाम्पत्याने मिष्टान्न भोजन देऊन आगळ्या-वेगळ्या पध्दतीने आपल्या विवाहाचा वाढदिवस साजरा केला.

कोणताही वाढदिवस साजरा करतांना उत्सव प्रवृत्ति सोबतच श्रीमंतीचे प्रदर्शन होत असते. वाढदिवसाचे औचित्य साधुन मौज,मस्ती, धिंगाणा करून आनंदोत्सव साजरा करण्याच्या प्रकाराला फाटा देत पाचोरा येथील शिक्षक दाम्पत्याने आपल्या लग्नाचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. खड़कदेवळा हायस्कूलचे शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते शिवाजी शिंदे व त्यांच्या पत्नी तथा मिठाबाई कन्या शाळेच्या शिक्षिका नम्रता शिंदे यांनी ता.२६ एप्रिल रोजी आपल्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी पाचोरा येथील आधारवड या वंचितांसाठीच्या मोफत भोजन केंद्रात सुमारे दोनशे भुकेल्यांना मिष्टान्न भोजन दिले. शिंदे दांपत्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रसंगी शिवाजी शिंदे,नम्रता शिंदे, कु.वेदश्री शिंदे, भूषण देशमुख,प्रवीण पाटिल,संदीप महाजन,भाग्येश शिंदे,सी.एन. चौधरी,राहुल पाटिल,रविन्द्र पाटिल, अनिल येवले, प्रा,रविन्द्र चव्हाण, प्रा. के टी भारुले, माया सूर्यवंशी, उज्वला महाजन, प्रा.प्रतिभा परदेशी, प्रा अंकिता शेळके,प्रा संगीता राजपूत, साहेबराव पाटिल,प्रमोद चौधरी,शिवाजी बागुल आदि मान्यवर,शिक्षक, शिक्षिका व सहकारी उपस्थित होते.

Add Comment

Protected Content