असंख्य बलिदानातून भारत भूमी जगासाठी आदर्शवत – प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी

फैजपूर प्रतिनिधी । हजारो वर्षापासून भारतभूमी परकीय आक्रमणे, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्रोत्तर संघर्ष आणि असंख्य बलिदानातून प्राप्त देशाचे स्वातंत्र्य व संविधानावर आधारित लोकशाही गणराज्य अवघ्या विश्वाला मार्गदर्शक आणि आदर्शवत असल्याचे मत प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांनी व्यक्त केले.

ते फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिवसाच्या औचित्याने आयोजित ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

यावेळी शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ पिंगला धांडे, औषधनिर्माण पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. एल. चौधरी, लोकसेवक मधुकरराव चौधरी औषधनिर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही आर पाटील यांच्यासोबत विविध शाखांचे सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेटस आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोना विषाणू प्रादुर्भावा च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक प्रशासन आणि विद्यापीठ यांच्या अटी व नियमांच्या अधीन राहून धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी वर्षानिमित्त धार्मिक आणि सामाजिक एकोपा या ज्वलंत विषयावर पथनाट्य सादर करण्यात आली. कॅडेट वेदांत राजपूत याने प्रजासत्ताक दिवसाचा इतिहास आणि वर्तमानात युवकांची जबाबदारी या विषयावर मनोगत व्यक्त केले. कॅडेट गणेश चव्हाण याने देशभक्तीपर गीत सादर करून सैनिकांच्या प्रती सन्मान व्यक्त करणारी भावनिक कविता सादर करून उपस्थित सर्वांच्या टाळ्या मिळवल्या.

याप्रसंगी प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात फैजपुर चे योगदान, कर्मयोगी धनाजी नाना चौधरी व लोकसेवक मधुकरराव चौधरी यांचा सामाजिक सेवेचा वारसा आणि महाविद्यालयाचे शैक्षणिक योगदान याविषयी सांगतानाच महत पराकाष्टा ने मिळालेल्या स्वातंत्र्याचा व्यक्तिगत, सामाजिक आणि देशाच्या विकासात भर टाकून भारतभूमी चा नावलौकिक वाढवण्यात मोलाची भूमिका पार पाडावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी दिव्य मराठी वृत्तपत्र समूहाच्या वतीने प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांना खान्देश रत्न पुरस्कार जाहीर केल्याबद्दल उपप्राचार्य डॉ अनिल भंगाळे यांच्या हस्ते खान्देशरत्न प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष शिरिष चौधरी आमदार – यावल / रावेर विधानसभा मतदारसंघ, सर्व सन्माननीय संस्था पदाधिकारी महोदय, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर. चौधरी, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ दीपक सूर्यवंशी, क्रीडा संचालक डॉ जी एस मारतळे, राष्ट्रीय सण व उत्सव समिती चेअरमन डॉ आय पी ठाकूर, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ जी जी कोल्हे, श्री संतोष तायडे, श्री नारायण जोगी, श्री शेखर महाजन, श्री सिद्धार्थ तायडे, श्री गुलाब वाघोदे, श्री पराग राणे इत्यादींनी मार्गदर्शन व परिश्रम घेतले.

 

Protected Content