तापी नदी पात्रात अडकलेल्या दोन युवकांची थरारक सुटका (व्हिडीओ )

साकेगाव ता. भुसावळ जितेंद्र पाटील । येथून जवळच असलेल्या तापी नदीच्या पात्रात खेकडे पकडण्यासाठी गेलेले भुसावळचे दोन युवक अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याचे अडकून पडले. प्रत्येक क्षणाला वाढणारे पाणी पाहून त्यांना धडकी भरली असतांनाच साकेगाव येथील काही जणांनी अतिशय हिंमतीने दोर बांधून त्यांना बाहेर काढले.

याबाबत वृत्त असे की, भुसावळ शहरात गजानन मंदिराजवळ वास्तव्यास असणारे हिरालाल प्रेमसिंग बारेला आणि जेत्रम सिताराम बारेला (रा, गजानन महाराज मंदिर) हे दोन तरूण दुपारी एक वाजता खेकडे पकडण्यासाठी खेकडे पकडण्यासाठी आले होते. साकेगाव येथील एमआयडीसीच्या जलशुध्दीकरण प्रकल्पाच्या खालील बाजूस असणार्‍या तापी नदीच्या पात्रात त्यांनी खेकडे शोधण्यास प्रारंभ केला. ते नदी पात्रात उतरले असता तेथे पाणी नव्हते. तथापि, काही क्षणांमध्येच ते पाण्याच्या जोरदार प्रवाहात वेढले गेले. त्यांनी तातडीने घाबरून पात्रातील उंच खडकावर आश्रय घेतला. मात्र पाणी अतिशय जलद गतीने वाढत गेल्याने ते अक्षरश: भेदरले.

दरम्यान, नदी पात्रात दोन तरूण खडकावर अडकून पडल्याचे येथे फिरण्यासाठी आलेल्या विजय भोळे (रा. साकेगाव) यांना दिसले. त्यांनी तातडीने साकेगावातून काही जणांना बोलावले. आज तापी नदीवरील हतनूर धरणाच्या वरील भागात जोरदार पाऊस झाल्याने दुपारीच ३६ दरवाजे उघडण्यात आल्याने पाण्याची पातळी क्षणाक्षणाला वाढत होते. यातच त्यांच्या पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करायचा झाल्यास पात्रातून प्रचंड गतीने पाणी वाहत असल्याने ते देखील शक्य नव्हते. दरम्यान, उपस्थितांनी कसे तरी करून अडकलेल्या दोन्ही जणांपर्यंत दोर पोहचवला. मात्र त्यांना सुरक्षितपणे किनार्‍यावर आणणे काही कुणाला सुचत नव्हते. ही परिस्थिती पाहून साकेगावातील पट्टीचे पोहणारे म्हणून ख्यात असणार्‍या मंगल देविदास कोळी यांनी प्रचंड गतीने दुथडी वाहणार्‍या तापी पात्रात उडी मारली. दरम्यान, पाण्याच्या प्रवाहात ते देखील वाहू लागल्याने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. तथापि, त्यांनी अतिशय कौशल्याने दोर पकडला. यानंतर ते दोन्ही तरूण उभे असणार्‍या खडकावर गेले. तेथे त्यांनी खडकाला दोर मजबूतपणे बांधला. तसेच त्यांनी स्वत: तो दोर पकडून धरला. यानंतर ते दोन्ही तरूण याचाच आधार घेऊन किनार्‍यावर आले. तर मंगल कोळी हे सर्वात शेवटी दोराला धरून किनार्‍यावर आले तेव्हा उपस्थितांच्या जीवात जीव आला.

नदी पात्रातून बाहेर आल्यानंतर हिरालाल प्रेमसिंग बारेला आणि जेत्रम सिताराम बारेला या दोन्ही तरूणांच्या तोंडातून अक्षरश: शब्द देखील निघत नव्हता. ते प्रचंड घाबरलेले होते. लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे साकेगाव येथील प्रतिनिधी जितेंद्र पाटील यांनी त्यांना धीर देत चहापाणी देऊन रवाना केले. या दोन्ही जणांचे जीव वाचवण्यासाठी विजय भोळे, मंगल कोळी, रोशन कोळी, मुकेश कोळी, देविदास चर्‍हाटे आदींसह अन्य साकेगावकरांनी अथक परिश्रम केले. खरं तर, यांच्या मदतीमुळेच त्या दोन्ही जणांचे प्राण वाचले.

पहा : या चित्तथरारक घटनेचा व्हिडीओ.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/407369226888744/?v=407369226888744

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !

वेबसाईट: https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

टेलिग्राम चॅनल : https://t.me/joinchat/AAAAAE-eyexYv4VIejc_qw

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

जळगाव । भुसावळ । चाळीसगाव । अमळनेर । पाचोरा । भडगाव । धरणगाव । पारोळा । एरंडोल । रावेर । यावल । बोदवड । मुक्ताईनगर । जामनेर । चोपडा या सर्व तालुक्यांमधील बातम्या । ब्रेकिंग न्यूज । मराठी न्यूज । मराठी ब्रेकींग न्यूज । खान्देश । खान्देश बातम्या । खान्देश न्यूज

jalgaon । bhusawal । chalisgaon । amalner । pachora । bhadgaon । dharangaon । parola । erandol । raver । yawal । bodvad । muktainavar । jamner । chopda । khandesh । breaking news । marathi breaking news । jalgaon news । bhusawal news । khandesh news । chalisgaon news

Protected Content