पहूर येथे नवीन ५ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह

पहूर, ता.जामनेर (वार्ताहर)। कोरोना संक्रमणाचे हॉटस्पॉट ठरलेल्या जामनेर तालुक्यातील पहूर येथे आज ५ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आल्याची माहिती पहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा नोडल अधिकारी डॉ. हर्षल चांदा यांनी दिली. पहूर येथे बाधितांची संख्या आता ५७ झाली आहे.

पहूर येथे दिवसेंदिवस कोरोना संक्रमणाची साखळी घट्ट होत आहे. आज बुधवारी कोरोना योद्ध्या ४५ वर्षीय जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकासह पहूर पेठ येथील एकाच कुटूंबातील मूलगा व आई तसेच संतोषीमाता नगर येथीलही एकाच कुटूंबातील मूलगा आणि वडिल अशा एकूण ५ जणांना बाधा झाली आहे. तसेच हिवरखेड्यातही कोरोनाने शिरकाव केला असून ८५ वर्षीय आजीचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. प्रशासनाच्या वतीने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कोरोना योद्ध्या शिक्षकास संसर्ग
पहूर येथे कोरोना योद्ध्या अंगणवाडी सेविका, रुग्णालयातील स्विपर बॉय, सफाई कर्मचारी महिले यांच्या पाठोपाठ वाकोद जिल्हा परिषद केंद्र शाळेतील प्राथमिक शिक्षक व पहुर पेठ येथील रहीवासी असलेल्या कोरोना योद्ध्या शिक्षकांची ड्यूटी काही दिवसांपूर्वी जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील चेक पोस्टवर होती. त्यांना त्रास जाणवत असल्याने त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. त्यांचा अहवाल आज पॉझीटीव्ह आला आहे.

कोरोना योद्ध्यांनो काळजी घ्या
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, परिचारिका, परिचारक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा वर्कर्स, सफाई कर्मचारी, पोलीस, शिक्षक, महसूल कर्मचारी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी कोरोनाशी लढा देता हेत. आपले कर्तव्य बजावताना आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, तोंडाला मास्क बांधावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. आवश्यकते नुसार वैद्यकिय सल्ला घ्यावा असे आवाहन वैद्यकिय अधिक्षका तथा नोडल ऑफिसर डॉ. हर्षदा चांदा यांनी केले आहे.

Protected Content