संयुक्त अरब अमिरातीत होणार आयपीएलचे उर्वरित सामने

मुंबई । संयुक्त अरब अमिरात अर्थात युएईमध्ये आयपीएलचे उर्वरित सामने खेळविण्यात येणार असल्याचा निर्णय आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतला.

कारण आयपीएलमधील उर्वरित सामन्यांचं आयोजन आता संयुक्त अरब अमिरात अर्थात यूएईमध्ये होणार आहे. बीसीसीआयच्या आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठक हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आयपीएलच्या चौदाव्या मोसमाची सुरुवात 9 एप्रिलपासून मुंबई आणि चेन्नई संघातील सामन्यापासून झाली होती. अहमदाबाद आणि दिल्ली पोहोचल्यानंतर अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर स्पर्ध तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बीसीसीआयने दोन सामने टाळण्यानंतर अखेर 3 मे रोजी चौदावा मोसम स्थगित करण्याचा निर्णय घेतला. चौदाव्या मोसमात साखळी फेरी आणि प्ले ऑफ असे एकूण 60 सामने होते. माहितीनुसार 18 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या काळात आयपीएलमधील शिल्लक राहिलेले सामने खेळवण्यात येतील.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.