Home Cities जळगाव उन्हाच्या कडाक्यात प्रवाशांना दिलासा ; जळगाव बसस्थानकात मोफत जलसेवा

उन्हाच्या कडाक्यात प्रवाशांना दिलासा ; जळगाव बसस्थानकात मोफत जलसेवा


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावच्या कडक उन्हाची झळ सोसत असलेल्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगाव नवीन बसस्थानकावर गेल्या दहा वर्षांपासून ‘जलसेवेचा’ एक अनोखा उपक्रम अत्यंत निष्ठेने राबविला जात आहे. जळगाव जिल्हा माहेश्वरी समाज, प्रेम फाउंडेशन आणि कलंत्री परिवाराच्या संयुक्त विद्यमाने प्रवाशांची तहान भागवण्याचे काम अविरत सुरू आहे.

दरवर्षी कडक उन्हाळ्याची सुरुवात होताच, म्हणजे २५ मार्च ते १ जून या कालावधीत बस स्थानकात येणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी हे थंड पाणी उपलब्ध करून दिले जाते. या उपक्रमाबद्दल माहिती देताना योगेश कलंत्री यांनी सांगितले की, दररोज साधारणपणे १५० ते ३०० लिटर पाणी प्रवाशांसाठी मोफत पुरवले जाते.

जळगावातील वाढते तापमान लक्षात घेता, बस स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांसाठी हा छोटासा प्रयत्न मोठा दिलासा ठरत आहे. समाजसेवेची ही परंपरा कलंत्री परिवाराने गेल्या एक दशकापासून जोपासली आहे. उन्हाच्या तडाख्यात प्रवाशांसाठी आधार बनलेल्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. अशा उपक्रमांमुळे माणुसकीचा ओलावा जिवंत राहत असून, इतर संस्थांनीही अशा प्रकारच्या समाजकार्यातून प्रेरणा घेणे गरजेचे आहे.


Protected Content

Play sound