Home क्राईम अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; भडगाव पोलीसांची कारवाई

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; भडगाव पोलीसांची कारवाई

0
120

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यात अवैध वाळू उपशाचे सत्र सुरूच असून, भडगाव पोलिसांनी यावर धडक कारवाई केली आहे. वाडजी फाटा परिसरात अवैधपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करत पोलिसांनी ४ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भडगाव तालुक्यात वाडजी फाटा परिसरात काही व्यक्ती विनापरवाना अवैध वाळू वाहतूक होत होती. २५ एप्रिल रोजी रात्री १:५० च्या सुमारास भडगाव पोलिसांच्या गस्ती पथकाला या ट्रॅक्टरचा संशय आला. पोलिसांनी या ट्रॅक्टरची तपासणी केली असता, त्यामध्ये निळ्या रंगाचा ‘पावर ट्रॅक’ कंपनीचा बिना नंबरचा ट्रॅक्टर आणि एक ब्रास गौण खनिज (वाळू) आढळून आले. पोलीसांनी वाळूने भरलेला ट्रॅक्टर जप्त केला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संतोष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून योगेश वसंत कोल्हे (रा. बालसर, ता. भडगाव) आणि सागर भालचंद्र पाटील (रा. वाक, ता. भडगाव) या दोघांविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील करत आहेत.


Protected Content

Play sound