जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या दिनदर्शिकेचे अनावरण पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्याहस्ते शनिवारी करण्यात आले. पोलीस अधीक्षक यांच्या दालनात हा कार्यक्रम पार पडला.
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख कुणाल मोरे यांनी प्रास्ताविकात दिनदर्शिकेची रचना, कल्पना व उपयुक्ततेवर प्रकाश टाकला. तसेच दिनदर्शिकेच्या माध्यमातून समाजाला संस्थेचा उद्देश पोहोचवण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश कांबळे, पत्रकार प्रतिनिधी चेतन वाणी, महानगराध्यक्ष किरण राजपूत, महिला अध्यक्ष तन्वी पांडव, उपसंपर्क प्रमुख अमित बच्छाव, उत्तर महाराष्ट्र जिल्हा संपर्क प्रमुख निवेदिता ताठे आदी उपस्थित होते. या उपक्रमामुळे समाजात पोलीस प्रशासनाबद्दल माहिती मिळेल आणि जनजागृती घडून येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची दिनदर्शिका संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आली असून सण, उत्सव, वार्षिक योजना, सांस्कृतिक महत्त्व, पोलीस प्रशासन यावर आधारित आहे. यामध्ये विशेषता सणांचे वर्णन, महत्त्वाच्या तारखा, प्रेरणादायी संदेश यांचा समावेश करण्यात आला आहे.