बीड-वृत्तसेवा | मस्साजोगच्या सरपंचांच्या खुनात धनंजय मुंडे यांच्या समर्थकांची नावे असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2025/01/advt-1.jpg)
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या निषेधार्थ आज बीडमध्य सर्वपक्षीय भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. यात संभाजीराजे हे देखील सहभागी झाले आहेत. त्यांनी याप्रसंगी धनंजय मुंडे यांच्यावर टिकास्त्र सोडले. ते म्हणाले की, कराड याला संरक्षण देणारे तिथले मंत्री यांची हकालपट्टी का झाली नाही? त्यांचा राजीनामा का घेतला नाही? हा आमचा सवाल आहे, असे ते म्हणाले. या मोर्चाला जातीय वळण नाही, हा सर्वधर्मीय मोर्चा आहे, असे ते म्हणाले.
बीड मध्ये मुंडे समर्थकांची मोठी दहशत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात हा बीड पॅटर्न कुठं होऊ नये याची दक्षता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी घ्यावी, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली.