कोरोना : जिल्ह्यात आज २१७ संक्रमित रूग्ण आढळले; ८९ रूग्ण झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवाला दिवसभरात २१७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ८९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जळगाव शहरासह भुसावळ तालुक्यात कोरोना रूग्ण जास्त प्रमाणात आढळून आले आहे.

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात २१७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ८९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. यात जळगाव शहरात-८८, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ -६०, अमळनेर-९, चोपडा-२०, पाचोरा-५, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-१, जामनेर-१, रावेर-५, पारोळा-५, चाळीसगाव-१८, मुक्ताईनगर-३, बोदवड-० असे एकुण २१७ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४५ हजार ३७६ कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ५४७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ५८० रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या २ हजार २४९ बाधित रूग्ण उपचार घेत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!