चिंचोली सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीत १३ संचालक बिनविरोध विजयी

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील चिंचोली येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची सन २०२१ ते २०२५ पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध संपन्न झाली. याप्रसंगी गावकऱ्यांनी बिनविरोध निवडून आलेल्या सर्व संचालकांचे अभिनंदन केले.

चिंचोली येथील विकासोची निवडणूक कार्यक्रम नुकताच पार पडला. १३ संचालक असलेल्या या संस्थेत सर्वसाधारण जागेतून अरुण पाटील, पंढरीनाथ कोळी , अनिल साठे, तुकाराम पाटील , भगवान सूर्यवंशी , पुरुषोत्तम शिंपी , रत्‍नाबाई पाटील, पांडूरंग देसले हे बिनविरोध निवडून आले.

इतर मागासवर्गीय मतदार संघातून सुनील साठे, महिला राखीव मतदार संघातून उषाबाई बडगुजर, कल्‍पनाबाई कोळी, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून अनिल सोळुंके, विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातून रतिलाल कोळी आदी. तेरा संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.

निवडणूक बिनविरोध होण्याकामी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष सोळुंके, शिवसेनेचे किरण सोळुंके, माजी सरपंच परमानंद साठे, शिवसेनेचे गोपाल चौधरी, माजी सदस्य देवीदास कोळी, माजी चेअरमन दिवाकर बडगुजर, वासुदेव साठे, ग्रा.प.सदस्य प्रदिप सोळुंके, संजय पाटील, वासुदेव पाटील आणि ग्रामस्थांचे सहकार्य लाभले तर संपुर्ण निवडणूक कार्यक्रम शांततेत पार पाडण्याकामी निवडणूक निर्णय अधिकारी एम.पी. भारंबे व सचिव दिनकर पाटील यांनी काम पाहिले .

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!