आतातरी पेट्रोल-डिझेलचे दर तात्काळ कमी करा!- फडणवीस

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | केंद्र सरकारने ३१ मे पर्यंत जीएसटीसह जानेवारीच्या कम्पेन्सेशनची रक्कम सर्व राज्यांना देण्यात आली. यात सर्वाधिक रकम १४,१४५ कोटी रुपये राज्याला मिळाले, आता तरी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा, असे राज्याचे विधानसभा विरोधीपक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

राज्याची २६,५०० कोटींची जीएसटी कराची थकबाकी असल्याचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून नेहमीच करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून ३१ मे अखेर वस्तू आणि सेवा कराच्या अनुदानाची ८६,९१२ कोटींची रक्कम सर्व राज्यांना वितरीत केली. यात महाराष्ट्राच्या वाटय़ाला सर्वाधिक १४,१४५ कोटी रुपये आले असून राज्यांची नुकसानभरपाईची सर्व रक्कम वितरित केल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. यासंदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

 कर्तबगारी ऐवजी मविआकडून केंद्रावर दोषारोप करण्यातच पुरूषार्थ

केंद्र सरकारने ३१ मे रोजी सर्व राज्यांना जीएसटी, जानेवारीपर्यंत कम्पेन्सेशनसह संपूर्ण रक्कम दिली आहे. यात महाराष्ट्राला सर्वाधिक १४,१४५ कोटी. आता तरी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा. राज्य सरकार म्हणून कर्तबगारी दाखविण्याची वेळ महाविकास आघाडीवर आली की प्रशासनाची ‘ढकलगाडी’ करण्यातच त्यांनी धन्यता मानत केंद्रावर दोषारोप करत पुरूषार्थ दाखवला आहे. आतातरी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा! कि पुन्हा आज १ जूनपासूनचे अद्यापही कोटींची थकबाकी येणे केंद्राकडे कायम असल्याचे दाखवून केंद्रावर खापर फोडत धन्यता मानणार आहात ? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Protected Content