रासायनिक खत व पेट्रोल, डीझेलची दरवाढ कमी करा : राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीची मागणी

पारोळा प्रतिनिधी । केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या व पेट्रोल ,डिझेलची केलेली  दरवाढ कमी करावी  यासह इतर मागण्यांचे निवेदन माजी पालकमंत्री सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अनिल गवांदे यांना देण्यात आले. 

निवेदनात पुढील मागण्यादेखील करण्यात आल्या आहेत. यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करण्यात यावे, शासकीय ज्वारी, बाजरी, मका खरेदी केंद्र त्वरित सुरु करण्यात यावे लसिकरण साठा जास्त प्रमाणात उपलब्ध करुण देण्याची मागणी करण्यात आली आहे.निवेदन देतांना जि. प. सदस्य रोहन पाटील,  जिल्हा सरचिटणीस  मनोराज पाटील,  जि.  प. सदस्य हिम्मत पाटील ,तालुका अध्यक्ष यशवंत पाटील , युवक तालुका अध्यक्ष योगेश रोकडे, युवक जिल्हा उपाध्यष अंकुश भागवत, समता परिषद् तालुका अध्यक्ष संतोष महाजन सर , पारोळा शहर अध्यक्ष कपिल चौधरी, युवक जिल्हा उपाध्यक्ष् अभिषेक पाटील,  युवक पारोळा शहर अध्यक्ष गणेश पाटील, युवक तालुका कार्याध्याष दीपक पाटील,  विद्यार्थी जिल्हा सरचिटणीस लोकेश पवार,  युवक पारोळा शहर उपाध्यक्ष हर्षल पाटील, ललित सोनवणे महिला जिल्हा सरचिटणीस सुवर्णा पाटील, जिल्हा सरचिटणीस शेंडे ताई ,जिल्हा सरचिटणीस अन्नपूर्णा पाटील, कृष्णा पाटील, चंद्रकांत पाटील आदि राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

Protected Content