चाळीसगाव येथे कामगार प्रबोधन मेळावयाचे आयोजन

WhatsApp Image 2020 01 04 at 7.37.23 PM

चाळीसगाव, प्रतिनिधी | येथे राजपूत मंगल कार्यालयात आज दि. ४ जानेवारी रोजी बहुजन विद्युत अभियंता अधिकारी व कर्मचारी फोरम च्या जळगाव झोन शाखा आयोजित कामगार प्रबोधन मेळावा घेण्यात आला . या मेळाव्यास महावितरण कंपनीचे संचालक (संचालन) दिनेशचंद्र साबू उद्घाटक म्हणून उपस्थित होते.

दिनेशचंद्र साबू यांनी उद्घाटनपर भाषणात महावितरणची भूमिका व वाटचाल सविस्तर पणे विशद केली. कंपनी सद्या बिकट अवस्थेत असून कर्मचारी व अभियंता यांनी थकबाकी वसुली तसेच ग्राहकांना योग्य सेवा देण्यावर भर दिला पाहिजे. कागदावर नफ्यात असली तरी प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. भार नियमन व वीज पुरवठा खंडित होणे असे प्रकार भविष्यात होणार नाहीत असे पाउल टाकले जाणार आहेत. कर्मचारी तणावात आहेत हे मान्य करून ,तणावरहित काम कसे करता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रम संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष शिवाजी वायफळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. तर कार्याध्यक्ष धर्मभुषण बागुल यांनी प्रास्ताविक केले. जळगाव परीमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधिक्षक अभियंता शेख, संजय खंदारे अधिक्षक अभियंता नाशिक ,फोरम चे सरचिटणीस एम. बी. अहिरे,केंद्रीय पदाधिकारी भगवान नाईक ,बी. डी. जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. डी. भामरे , डी. डी. राठोड ,भाऊसाहेब गांगुर्डे , व्ही. यू. मोरे कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे आदी उपस्थित होते. झोन सचिव विजय सोनवणे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कारभारी केदार, चेतन नागरे, राजू वाघ, अजय खालकर, दत्तात्रय पगारे, दीपक पवार, विशाल पाटील, गणेश अहिरे, योगेश सोनार, रमेश बागुल, काशिनाथ सुतार यांच्यासह स्थानिक पदाधिकऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी कामकाज पहिले.

Protected Content