एकविरा माता मंदिरातून चांदीचा मुकूट व छत्राची चोरी

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील बामणोद येथील एकविरा माता मंदिरातीत देवीचे चांदीचे मुकूट, छत्र आणि दानपेटीतील रक्कम अज्ञात चोरट्यांनी तोडून मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील बामणोद येथे गावाच्या बाहेर एकविरा मातेचे मंदीर आहे. शनिवार १४ मे रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एकविरा मातेच्या मंदीराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून १५ हजार रूपये किंमतीचा चांदीचा मुकूट, १५ हजार ३०० रूपये किंमतीचे छत्र आणि दानपेटीतील १ हजार रूपयांची रोकड असा एकुण ३१ हजार ३०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे रविवारी १५ मे रोजी उघडकीला आली. याप्रकरणी रमेश गणपत सोनवणे रा. बामणोद ता. यावल यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सोमवार १६ मे रोजी दुपारी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गोकुळ तायडे करीत आहे.

 

Protected Content