पाचशे रूपयाची नोट दाखवून महिलेचा विनयभंग

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या महिलेला पाचशे रूपयाची नोट दाखवून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंप्राळा परिसरातील एका भागात राहणारी २५ वषीय महिला ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवारी १५ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास एहमद नुरशेख लतीफ रा. पिंप्राळा या तरूणाने महिलेला ५०० रूपयांची नोट दाखवून, पाचशे रूपये घे आणि माझ्यासोबत चल असे बोलून महिलेचा विनयभंग केला.

याप्रकरणी विवाहितेने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी एहमद नुरशेख लतीफ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ सुशिल चौधरी करीत आहे.

 

Protected Content