धक्कादायक : महिलेचे व्हिडीओ व फोटो काढून विनयभंग

भुसावळ- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणारी महिलेचे अंघोळ करून कपडे घालतांनाचे काढून व्हिडीओ व फोटो काढून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील एका भागात राहणारी २९ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवार १६ मे रोजी सकाळी ८ वाजता महिला अंघोळ करून कपडे घालत असतांना शेजारी राहणारा संशयित आरोपी प्रतिक जीवन शिंगारे (वय-३४) याने व्हिडीओ आणि फोटो काढले. हा प्रकार महिलेच्या लक्षात येता त्यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी प्रतिक शिंगारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि प्रदीप चौधरी करीत आहे.

Protected Content