राष्ट्रीय चर्मकार संघाच्या निवेदनात कठोर कारवाईची मागणी

पाचोरा प्रतिनिधी । युपीतील हाथरस येथील पिडीतेच्या आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा करावी अशा मागणीचे निवेदन येथे राष्ट्रीय चर्मकार संघातर्फे देण्यात आले.

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने पाचोरा, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पोलिस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, उत्तर प्रदेश मधील हाथरस जिल्ह्यातील एका खेडेगावात राहणार्‍या दलित समाजाच्या मुलीवर उच्च जातीच्या गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी अमानुष बलात्कार केला. त्या गावगुंडानी बलात्कार करून शांत बसले नाहीत. त्यांनी त्या पिडीत मुलीचे हातात पायाची हाडे तोडली, जीभ कापली व गळा दाबून जीवेमारण्याचा प्रयत्न केला. हॉस्पिटल मध्ये उपचार दरम्यान तीचा मृत्यू झाला.

पिडीत तरूणीने पोलिसांना दिलेल्या जबानी वरून तात्काळ त्या गुंड प्रवृत्तीच्या युवकांना अटक करण्यात आली. दलित परीवारातील मुलगी ही १९ वर्षीय असुन ती आपल्या शेतात गुरांना चारा देण्यासाठी गेली असता आरोपींनी तीचा वर पाळत ठेवून अमानुष पणे अत्याचार केला. या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे.
आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या आदेशानुसार निवेदन देण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष गोवर्धन जाधव, तालुका उपाध्यक्ष, राजीव पदमे, सचिव, उमेश सोनवणे, राजेंन्द्र सोनवणे, रमेश सोनवणे, शशिकांत लिंगायत, रमेश पवार, बी. मोरे, मनोज पवार, प्रकाश लक्ष्मण, सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content