बिहारमध्ये भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

पाटणा: वृत्तसंस्था । बिहार विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच, पाटणा येथील दानापूरमध्ये भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या गुंडांनी भाजप नेता राजेश कुमार झा यांची गोळ्या झाडून हत्या केली. ते मॉर्निंग वॉकला गेले होते.

गुंडांनी भाजप नेता राजेश कुमार झा यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. भाजप नेत्याच्या नातेवाइकांकडे पोलीस चौकशी करत आहेत. राजेश कुमार झा यांचे कुणासोबत वाद होते, याचा तपास केला जात आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतरच काही ठोस सांगता येईल, असे पोलीस म्हणाले.

Protected Content