सगळ्यांचे जगणे सुरळीत ठेवून कोरोना वाढू न देणे हीच खरी कसोटी — आमदार शिरीष चौधरी( व्ही डी ओ )

 

 

रावेर : प्रतिनिधी । सगळ्यांचे जगणे सुरळीत ठेवून कोरोना वाढू न देणे हीच खरी कसोटी  असल्याने लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा समन्वय व लोकांचा सहभाग महत्वाचा आहे असे प्रतिपादन आज  आमदार शिरीष चौधरी यांनी केले .

 

 

कोरोना  सेंटरला भेट दिल्यावर माध्यमांशी बोलताना आमदार शिरीष चौधरी पुढे म्हणाले की , लॉक डाउन कडक अंमलबजावणीवर बरेच लोक नाराज आहेत . कारण त्याचा जास्त त्रास हातावर पोट  असणाऱ्या मेहनतीची कामे करणारांना होतो हे खरे आहे पण त्याचवेळी हे लक्षात घ्यावे लागेल की लॉक डाउन कडक केल्यामुळेच आता कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसतो आहे त्यामुळे सगळ्यांचे जगणे सुरळीत ठेवून कोरोना वाढू न देणे हीच खरी कसोटी  असल्याने लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा समन्वय व लोकांचा सहभाग महत्वाचा आहे . लॉक डाउन मध्ये  हातावर पोट असणारांचे नुकसान होते म्हणून त्यांना मदत देण्याचे सरकारचे धोरण असले तरी  मदत पुरेशी ठरत नाही हे वास्तव आहे हे मान्य आहे असेही ते म्हणाले

 

आमदार शिरीष चौधरी पुढे म्हणाले की , या कोरोना सेंटर मधील रुग्णांच्या तक्रारी आणि अडचणी समजून घेण्यासाठी आज आलो आहे आता सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तक्रारींवर उपायांचे निर्णय घेतले जातील औषधे आणि उपकरणांच्या  परिस्थितीवरही अधिकारयांशी माझी चर्चा होणार आहे त्या बैठकीत सर्व आवश्यक निर्णय घेतले जातील माझ्या निधीतून २ रुग्णवाहिका खरेदीला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे यावल तालुक्यात ऑक्सिजन प्लांटची गरज आहे का याबद्दल मी तज्ज्ञांशी   आणि जिल्हा शल्य चिकीत्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे त्यांचा सल्ला घेऊन आम्ही निर्णय घेऊ रावेर आणि यावल तालुक्यात रुग्ण बरे होण्याचा दर ८५ टक्के हा दिलासादायक आहे मात्र  आता गाफील राहिलो तर पुन्हा धोका होईल कारण तिसरी लाट  आली तर लहान मुलांना त्यात जास्त त्रास होईल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे तज्ज्ञ अभ्यास करीत आहेत लहान मुलांना तिसरी लाट घातक  ठरू शकते अशा अंदाजामुळे आतापासूनच सगळी तयारी आणि नियोजन करावे लागणार आहे  , असेही  ते म्हणाले

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/585997192352048

Protected Content