मजुरांना पोलीसांकडून मारहाण व शिवीगाळ ; निवेदनाव्दारे हाकलपट्टी करण्याची मागणी

जळगाव प्रतिनिधी । रावेर येथे हमाली काम करणाऱ्या मजूरांना रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करून हाकलपट्टी करावी, अशी मागणी जळगाव अल्पसंख्यांक समाजाने शनिवारी ६ नोव्हेंबर रोजी दुपारी अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांना निवेदन देवून केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गुरूवारी ४ नोव्हेंबर रोजी रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल कुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील , सचिन घुगे व इतरांनी मिळून रावेर येथील हमाली काम करणारे मोहम्मद बाबर तसेच मजुरी करणारे अमजद शेख हाफिज, मुजाहिद शेख हाफिज, नफीस शेख हाफिज, शेख हाफिज हुसेन,शेख आवेज शकील यांना पोलीस स्टेशन मध्ये बोलवून कोणतेही कारण नसताना त्यांना गंभीर स्वरूपा ची मारहाण केली, जाती वाचक शिवीगाळ करून त्यांच्याकडून पैशाची मागणी करणारे वरील सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या विरोधात ५ व ६ नोव्हेंबर रोजी अब्दुल रहमान शेख करीम यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी फैजपुर व  पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याकडे दिलेल्या तक्रारीनुसार सदर प्रकरणाची एसआयटी च्या माध्यमाने चौकशी करावी व तीन दिवसात संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली.

याप्रसंगी मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख व उपाध्यक्ष सय्यद चाँद, एमआयएम जिल्हाध्यक्ष शेख अहमद हुसेन, महानगराध्यक्ष दानिश अहमद, काँग्रेस महानगराध्यक्ष नदीम काझी, शिवसेना अल्पसंख्यांक महानगराध्यक्ष जाकिर पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष फिरोज शेख, शिकलगर बिरादरीचे अन्वर खान, मेहरून एमआयएमचे इमरान खान, नजर फातेमा पिरजादे यासह रावेरचे आसिफ शेख दारा ,फिरोज खान गुलाब खान, रहमान मालक लूकमान मलक, शेख सलीम इमाम, अब्दुल रहमान करीम, इमरान खान इक्बाल खान, शेख कलीम शेख अजीज, अमजद खान नसरूल्ला  खान व शेख हमीद शेख रफिक आदींची उपस्थिती होती.

 

 

 

Protected Content