जॅकवेलमधील चोरीस गेलेले पाईप शेतात आढळले

यावल प्रतिनिधी । शहरास पाणीपुरवठा करणार्‍या नगरपालीकेच्या जॅकवेलमधील चोरीस गेलेले पाई हे थोड्या अंतरावर असणार्‍या केळीच्या शेतात केळीच्या सुकलेल्या पानाखाली लपवून ठेवलेल्या स्थितीत आढळून आल्या आहेत.

चोरीस गेलेले चार लाखाचे वीज पंप केळीच्या शेतात आढळून आले असुन याबाबतची माहीती कामावर गेलेल्या मजूरांना आढळले असल्याची माहीती शेत मालकाने दिली पोलिसांना दिली असुन ,शहरास पाणीपुरवठा करणा-या नगरपालीकेच्या साठवण तलावावरील तीन लाख रुपयांच्या दोन विद्युत पंप तर  लगतच्या शेतातील एका शेतक-याच्या४५ हजाराचे दोन पंपं  शुक्रवारी सकाळी  साठवण  तलावा पासून काही अंतरावर त्याच शिवारात असलेल्या अभय फेगडे यांच्या केळीच्या शेतात केळीच्या  सुकलेल्या पानाखाली लपवून ठेवलेल्या स्थीतीत आढळून आल्या आहेत. यावल पोलीस चोरटयांचा शोध मार्गावर आहेत.

यावल शहरापासुन सुमारे दोन किलोमिटर अंतरावरील भालशिव रस्त्यावरील शहरासाठी नगर परिषद व्दारे पाणीपुरवठा करणा-या साठवण तलावावरील इलेक्ट्रिकल पंपास जोडणी केलेली  ५५ हजार रुपये ममतीच्या केबल्सच्या वायरींसह आपतकालीन परीस्थीतीत वापरासाठी  असलेले तीन लाख रुपये किमतीचे३० (एच.पी.)  अश्वशक्ती क्षमतेचे दोन पंपतर याच परीसरातील  डॉ. सतीष यावलकर या शेतक-याच्या शेतातील  ४५ हजार रुपये किमतीचे दोन इलेक्ट्रिक पंपही चोरटयांनी चोरून नेले होते. या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शुक्रवारी दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सकाळी साठवण तलावाजवळील अभय फेगडे यांच्या केळीच्या शेतात केळीच्या पानांखाली इलेक्ट्रिक पंप लपवून ठेवलेल्या अवस्थेत असल्याचे मजुरांना दिसल्यावर वर त्यांनी शेत मालकास माहिती दिली आता शेतमालक

 

फेगडे यांनी   पोलीसांना कळविले  असता पोलीस निरिक्षक सुधिर पाटील  तपासाधिकारी फौजदार  विनोद खांडबहाले, पोलीस कर्मचारी संजय तायडे यांनी घटनास्थळी  भेट दिली असुन गुन्ह्यातील आरोपींचा शोध व पुढील तपास सुरू आहे.

Protected Content