अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले; महसूल पथकाची कारवाई

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात अवैध वाळू उपसा थांबता-थांबेनासा झाला आहे. मध्यरात्री तहसिलदार बंडू कापसे यांनी दोन वाळु वाहतूक करणा-या ट्रक्टर-ट्रॉली वर कारवाई करत खळबळ उडाली आहे. दिवसभर शासकीय कामे आणि रात्री वाळू माफियांवर धडक कारवाईमुळे तहसिलदारांचे कौतुक होत आहे.

एका मंडळ अधिकाऱ्‍यांच्या छूपा पाठबळमुळे रात्रीच्या सुमारास वाळु वाहतूक होत असल्याची ओरड होत आहे. तर दूसरीकडे तहसिलदार बंडू कापसे यांनी बैठकीत अवैध वाळूवर कारवाई करा असे वारंवार सूचना देऊन सुध्दा अपेक्षित कारवाई होत नव्हती. अखेर रात्रीच्या सुमारास स्वता: बंडू कापसे यांनी अवैध वाळु विरुद्ध कारवाईच्या मोहिमेत आपल्या टीमसह सहभागी होऊन रसलपुर येथे वाळु वाहतूक करत असतांना (एमपी ६८ ए ४३४०) तर दूसरे एमच १९ एपी ५२९१ यांच्यावर धडक कारवाई करत जप्त केली आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यावेळी मंडळ अधिकारी यासिन तडवी, रावेर तलाठी स्वप्नील परदेशीं, कोतवाल गणेश चौधरी यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

Protected Content